सिंचन विहीर अनुदान योजना 2023, अनुदान ४ लाख मिळणार, आजच अर्ज करा

सिंचन विहीर योजना 2023

रोजगार हमी योजना सिंचन विहीर अर्ज pdf 2023, या पेज च्या शेवटी दिलेला आहे, तो तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता

शासनाने विहीर मंजुरीची पद्धत आत्ता सोपी केली आहे , जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. कसा अर्ज करावा , अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे याबाबद्दल खाली पूर्ण माहिती दिली आहे. Sinchan Vihir Anudan Yojana. यामध्ये सिंचन विहिरीसाठी मिळणार ४ लाख अनुदान मिळणार आहे, आणि मागेल त्याला विहिर मिळणार आहे त्यासाठी आजच अर्ज करा

लाभधारकाची निवड : सिंचन विहीर योजना 2023 लाभ धारकाची पात्रता

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट -१ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

सिंचन विहीर अनुदान योजना प्रवर्ग

अ) अनुसूचित जाती

ब) अनुसूचित जमाती

क) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

ड) भूसुधार योजनेचे लाभार्थी

इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

फ) अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)

ग) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती

ह) सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)

) स्त्री कर्ता असलेली कुटुंब

के) विकलांग

लाभधारकाची पात्रता

अ) लाभधारका कडे किमान 0.40 हेक्क्टर क्षेत्र सलग असावे

ड ) लाभधारकाच्या 7/12 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये

ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा (Online)

ब) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,

क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. 1. दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.

ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

4.विहीरीसाठी अर्ज 2023

३.१ इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ अर्जाचा नमूना व ब संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा. vihir anudan yojana maharashtra 2022 /2023

विहीर योजना ऑनलाईन अर्ज / vihir yojana online application

सध्या विहीर योजने साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही, तोपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.

आर्थिक मर्यादा / विहीरीसाठी अनुदान 2023

अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्हयाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विहिरींची मापे निश्चित करून घ्यावीत. सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचारात घेवून शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०१२/प्र.क्र.३०/रोहयो-१, दिनांक १७ डिसेंबर, २०१२ अधिक्रमीत करून शासन विहीरीच्या किमतीची कमाल मर्यादा रु.३.०० लाखावरुन रु.४.०० लाख करीत आहे.

सिंचन विहीर अनुदान योजना 2023 शासन निर्णय

सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज Form pdf

सिंचन विहीर अनुदान योजना प्रस्ताव

अधिक आणि सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनातर्फे या योजनेबद्दल आलेला जीआर अधिकृत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

One Reply to “सिंचन विहीर अनुदान योजना 2023, अनुदान ४ लाख मिळणार, आजच अर्ज करा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *