क्रिकेटमध्ये मोठं स्थान मिळवण्यापूर्वी रिंकू सिंग सफाई कामगार बनण्यापासून दूर नव्हता. किंबहुना त्याच्या स्वत:च्या इच्छेमुळेच तो क्रिकेटच्या वाटेवर कायम राहिला. त्याने या खेळात मोठे स्थान निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
रिंकू सिंग या भारतीय क्रिकेटपटूचे आयुष्य संघर्ष आणि कष्टांनी भरलेले आहे. प्रोफेशनल क्रिकेटपटू होण्याच्या प्रवासात त्याने असंख्य अडथळे पार केले आहेत. त्याची कहाणी प्रेरणादायी आहे.
मूळचा उत्तर प्रदेश (यूपी) येथील रहिवासी असलेला रिंकू सामान्य पार्श्वभूमीचा आहे. मात्र रिंकूचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबात वडील घरोघरी सिलिंडर पोहोचवायचे. तर भाऊ रिक्षा चालवायचा.
रिंकू क्रिकेट मध्ये नाव कामवायच्या आधी तो सफाई कामगार बनण्यापासून दूर न्हवता
त्याचा असा झाला होत कि घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे, त्याचा भाऊ त्याला एकेठिकाणी कामासाठी घेऊन गेला होता. –
“तो मला एका ठिकाणी घेऊन गेला जिथे त्यांनी मला घरकाम करण्यास सांगितले – साफ, सफाई आणि झाडू मारणे . मी परत घरी आलो आणि माझ्या आईला म्हणालो , ‘मी पुन्हा कुठे कामाला जाणार जाणार नाही. मला फक्त क्रिकेटमध्ये नशीब आजमावू दे” रिकु सिंग सांगतो.
रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यात झाला होता. रिंकूला वाचनात फारसं विशेष प्राविण्य नव्हत. पण त्याला सुरुवातीपासूनच क्रिकेटची आवड होती. रिंकू नववीत नापास झाला आहे. मात्र, त्याला क्रिकेटची पहिल्यापासून आवड असल्यामुळे, त्याने क्रिकेट खेळने सुरु ठेवले.
क्रिकेट क्रिकेट क्रिकेट
रिंकू सिंगला २०१३ साली उत्तर प्रदेश च्या १६ वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली होती. यानंतर त्याची १९ वर्षांखालील गटातही निवड झाली. त्याने २०१८ मध्ये उत्तर प्रदेश विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्ध ४४ चेंडूत ९१ धावांची खेळी केली होती.
या डावखुऱ्या फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४० सामन्यांत ५९.८९ च्या सरासरीने २८७५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए (५० षटकांच्या क्रिकेट) मध्येही त्याची सरासरी ५३.०३ इतकी आहे, त्याने ५० सामन्यांत १७४९ धावा केल्या आहेत
आयपीएल करियर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या रिंकूला, २०१८ च्या लिलावात केकेआरने ८० लाख रुपयांना विकत घेतल्यानंतर आयपीएलमध्ये त्याची सुरुवात कठीण झाली होती. त्याला २०१८ च्या मोसमात चार सामन्यांत केवळ २९ धावा करता आल्या.
त्यानंतरच्या वर्षी पाच सामन्यांत ३७ धावा करता आल्या. 80 मध्ये तो फक्त एका सामन्यात खेळला होता
तर पुढच्या वर्षी तो बेंचवर राहिला होता.
त्याच्या जुन्या खराब कामगिरीनंतर सुद्धा KKR ने त्याला ५० लाखात खरेदी करण्याचा निणर्णय घेतला
आणि KKR चा निर्णय सार्थ ठरवत रिंकूने 174 सामन्यांमध्ये 7.34 च्या सरासरीने 80.148 च्या शानदार स्ट्राईक रेटने 72 धावा केल्या.
And finally
रिंकू सिंगचा यशाचा प्रवास
शेवटी, रिंकू सिंगचा यशाचा प्रवास हा कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या शक्तीचा दाखला आहे. असंख्य आव्हानांचा सामना करूनही, त्याने व्यावसायिक क्रिकेटर बनण्याचे स्वप्न कधीच सोडले नाही. त्याची कथा अशी आहे जी आपल्या सर्वांना कधीही आपली स्वप्ने सोडू नये, आणि स्वतःला यशाकडे वळवत राहण्यासाठी प्रेरणा देईल